Puneri Pati- पुणेरी पाटी जिंदाबाद 

स्वच्छतेसाठी पुणेरी शालजोडे

संदीप कापडे : पुणेकर म्हणजे काहीतरी हटके असणारच. प्रेमळ भाषेत शालजोडे मारण्याची कला पुणेकरांना चांगलीच अवगत आहे . पुणेरी पाट्यातून हेच पहायला मिळते. पुणे तिथे काय उणे हाच स्वाभिमान पुणेकरांनी आजही जपून ठेवला आहे

पुण्यातील नवी पेठ परिसरातील  गांजवे चौकात एक दुकान मालकाने  पुणेरी पाटीतून चक्क धमकी दिली आहे.  या दुकानाच्या जवळील रस्त्यावरून ये जा करणारे लोक कायम या दुकानासमोर गुटखा, तम्बाकू खाऊन रस्ते खराब करत असतात. त्यामुळे कंटाळून या दुकान मालकाने ही पाटी लावत फुकटमध्ये रस्त्यांची रंगरंगोटी करणाऱ्यांना योग्य तो संदेश दिला आहे .

You might also like
Comments
Loading...