गल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट

पुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा फ्लेक्स . आता याचं पुणेरी फ्लेक्सच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पुण्यामध्ये निर्माण झालेल्या पाणीबाणीवरून सत्ताधाऱ्यावर निशाणा साधत ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट…. आशा आशयाचे फ्लेस्क संपूर्ण शहरभरात लावण्यात आले आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या धारणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना देखील पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पुणेकरांना पाणी संकटाला समोर जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच कधी पाईपलाईन फुटणे तर पालिकेला कोणतीही कोणतीही माहिती न देता जलसंधारण विभागाने पाणीपुरवठा तोडण्याचे प्रकार घडत आहेत.

दरम्यान, या सर्व गोष्टींना सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच आता सत्ताधाऱ्यावर निशाणा साधणारे पुणेरी स्टाईल फ्लेक्स शहरात झळकले आहेत.