विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी पुणेरी पलटण सज्ज

पुणे : प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून ‘पुणेरी पलटण’ची टीम नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाली आहे.गेल्या हंगामात पुण्याच्या टीम ला विजेतेपदाला गवसणी घालता आली नव्हती मात्र या पार्श्वभूमीवर यंदाच्या तुलनेत या हंगामासाठी संघात बरेच बदल करण्यात आले आहेत.
संघाचा आक्रमक खेळाडू दीपक हुडा यंदा पुणेरी पलटणच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे त्याचबरोबर काही नवीन खेळाडूंचाही संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील अक्षय जाधव, उमेश म्हात्रे, गिरीश कर्नक, गुरुनाथ मोरे या खेळाडूंचा पुणेरी पलटणमध्ये समावेश झाला आहे. प्रो कबड्डीमध्ये या वर्षी नव्या 4 संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे यंदा तब्बल 27 सामने होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंना फिटनेसवर अधिक लक्ष द्यावं लागणार असल्याने, पुणेरी पलटण जोमाने तयारीला लागली आहे.
पुण्यात आज पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुडा आणि प्रशिक्षक बी सी रमेश यांनी संघाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं.संघाला विजेतेपद मिळवून देणे