VIDEO : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मानाचे पाच गणपती आणि त्याचसोबत सर्व सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री उशीरा सुरु झाली आणि आज सकाळी विसर्जन झालं. आपल्या लाडक्या गणपतीचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पुणेकर मिरवणुकीत सहभागी झाले होते. पुण्यातील मानाच्या गणपतीचं विसर्जन वेळेत पार पाडण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत पुणेकरांनी गणपतींना निरोप दिला.