नववर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत

new year celebration at fc road pune

पुणे: तरुणाईच्या गर्दीने फुलून गेलेलं रस्ते. सगळीकडे लखलखाट आणि १२ वाजताच उसळलेला एकाच जल्लोष. हे चित्र आहे २०१७ ला निरोप आणि २०१८ चे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पुणेकरांचे. नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत पुणेकरांनी नववर्षाचे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात पुण्यातील एफसी रोड, कोरेगाव पार्क परिसर गर्दीने फुलून गेला होता.

एका बाजूला पब हॉटेलमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती, तर दुसरीकडे ‘दारू नको दुध प्या’ म्हणत अनेक संस्थांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. दरम्यान रात्री बारा वाजता नववर्षाचे शुभेच्छा संदेश थेट फोनकरून आणि व्हाटस्अॅपवर पाठवण्यात अनेक दंग झाल्याच चित्र देखील दिसून आल. मात्र अचानक एक तास व्हाटस्अॅप बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड देखील झाला.Loading…
Loading...