fbpx

राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’चा विषय ऐकण्याची पुणेकरांना संधी! 

पुणे : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे ब्रेन म्हणून ओळख असणाऱ्या मा. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे. निमित्त आहे ते शिवसमर्थ प्रतिष्ठान, मृत्युंजय अमावस्या मंच व विवेक व्यासपीठ यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाचे. शिवजयंती निमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात राजेंद्र निभोरकर ‘उरी ते बालाकोट – सर्जिकल स्ट्राईक ते एअर स्ट्राईक’ या विषयावर व्याख्यान देणार असल्याची माहिती शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे यांनी दिली.

येत्या रविवारी, दि. २४ मार्च २०१९ रोजी सायं ७ वाजता सनसिटी जवळील भाजी मंडई रोड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उरी हल्ल्यानंतर आपण केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये मा. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या घटनेचे महत्वाचे पैलू, आखलेली रणनिती याबद्दल थेट निभोरकर यांच्याकडून ऐकायला मिळणारे व्याख्यान आपणा सर्वांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

त्याचबरोर मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी भारतीय हवाई दलातील धाडसी अधिकारी अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याला अनोख्या पद्धतीने सलामी दिली जाणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य कुलकर्णी हे सायं ६ वाजता कार्यक्रमाच्याप्रवेशद्वारावर अभिनंदन यांचा मातीचा पुतळा घडविण्याचे कार्य ‘लाईव्ह’ करणार आहेत. हे देखील या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाला प्रोत्साहनदेण्याकरीता प्रचंड संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नागपुरे यांनी पुणेकरांना केले आहे.