fbpx

पुणेकरांना आली अजित दादांची आठवण, बापटांना टोमणा मारत अजित पवारांचे गुणगान

टीम महाराष्ट्र देशा :पुणेरी भाषेतून मारण्यात येणारे शालजोडे हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत, आजवर पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून अनेकांना पुणेकरांचा हिसका दाखवून दिलेला आहे. आता पुण्याचे पालकमंत्री असणारे गिरीश बापट हे निशाण्यावर आले आहेत.

मागील काही दिवसांपासून पाणी संकट झेलणाऱ्या पुणेकरांकर आता पाणी कपातीचे संकट येणार आहे. दुष्काळामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पाणी कपात करण्याचा निर्णय बापट यांनी गुरुवारी घोषित केला. याच मुद्द्यावरून माजी पालकमंत्री अजित पवार यांचे गुणगान गाणारे, तर विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांना टोमणा मारणारे फ्लेक्स संपूर्ण पुणे शहरात लावण्यात आले आहेत.

काय रे गिरीश, दुष्काळ असताना सुद्धा अजितने कधी पाणी कमी पडुन दिले नाही! तू तर आपल्या शहरातलाचं ना! पाणी कुठे मुरतय…. एक त्रस्त पुणेकर. अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. दरम्यान याच पुणेरी फ्लेक्सची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.