#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

पुणे : जून, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने पुणे शहराला पिण्यासह जिल्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत होती. मात्र, या आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे आता पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची वाढती संख्या हि पुण्यासाठी काळजीची बाब असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने अंशतः दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने सातत्याने हजेरी लावली असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल धरण १०० टक्के भरल्यानंतर या मौसमतील पहिला विसर्ग धरणाच्या गेट क्रमांक ६ मधून सुरु करण्यात आला होता. तो केवळ ४२८ क्युसेक असून येणाऱ्या काळात हा विसर्ग वाढू शकतो अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार काल संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर बघता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्या धरणातून ५ हजार १३६ क्युसेक वेगाने आता पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच महापालिकेचे आपत्ती विभाग देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

भाजपाच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाचा विळखा

दरम्यान, याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. त्यांनी,  ‘खडकवासला’तून ५ हजार १३६ क्युसेक वेगाने विसर्ग ! खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा वेग कायम असल्याने विसर्गाचा वेग ५ हजार १३६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची काळजी घ्यावी.’ असे ट्विट केले आहे.

मीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

खडकवासला धरण साखळीतील एकूण पाणीसाठा व टक्के (१३ ऑगस्ट २०२० सकाळी ६.०० वाजेपर्यंत)

खडकवासला : १.९७ टीएमसी/१०० %

पानशेत : ७.९२ टीएमसी/७४.३७ %

वरसगाव : ७.७६ टीएमसी/६०.५० %

टेमघर : १.७६ टीएमसी/ ४७.४६ %

एकूण पाणीसाठा : १९.४१ टीएमसी/६६.५८ %

(गेल्या वर्षी आजच्या दिवशी : २९.१५ टीएमसी/१०० %)