पुणे जिल्हा परिषद तयार करणार प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्तीसाठी पुस्तक

small student

पुणे : प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा परिषद आणि बालभारती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्तीसाठी पुस्तक तयार करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी पुस्तक तयार करणारी पुणे जिल्हा परिषद पहिलीच ठरणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी चांगला लागतो. या परीक्षांसाठी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी प्रत्येकवर्षी तयारी करून प्रावीण्य मिळवतात. या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांना खासगी प्रकाशकांकडून प्रसिद्ध होणार्या पुस्तकांवर अवलंबून रहावे लागते. यापुढे पुणे जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनाची पुस्तके उपलब्ध नाहीत. आत्तापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांवर अवलंबून रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांना ही पुस्तके शहरी भागातून विकत घ्यावी लागत अथवा त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंडळी स्वतः पुढाकार घेऊन खासगी प्रकाशनाची पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून देत होती. या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रामाची पुस्तके आता बालभारतीमध्ये तयार होणार आहेत.

गड-किल्यांच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरसावली

जिल्हा परिषदेने बालभारतीला प्रस्ताव पाठवून अधिकार्यांशी चर्चा केली आहे, मात्र लॉकडाऊनमुळे यामध्ये अचडणी येत असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके तयार होणार आहेत. इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रज्ञाशोध तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा घेण्यात येते.

पुस्तके तयार करण्यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. परंतु लॉकडाऊनमुळे हे शक्य होणार नसले तरी शाळा सुरू झाल्यानंतरच्या पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण होणार आहे. याशिवाय शेजारील जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन वर्ग चालवण्यात येतात, त्याचा चांगला परिणाम देखील सांगली जिल्ह्यात दिसून येत असल्याचे पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेत देखील शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती मिळावी, त्याविषयी गोडी लागावी या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.

कोरोनाचा विळखा वाढला, औरंगाबाद जिल्हा परिषदेने आरोग्य भरतीचा खेळ केला

अनुभवी शिक्षकांची होणार मदत…

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून प्रज्ञाशोध व शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये अनेक शिक्षकांना अनुभव आला आहे, काही शिक्षकांचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी प्रावीण्य मिळवतात. अशा शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा पुस्तक बनवण्यामध्ये करून घेतला जाणार आहे.

शिष्यवृत्तीची पुस्तके इतर कुठल्या जिल्हा परिषदेने तयार केली नाहीत, त्यामुळे पुणे जिल्हा परिषद ही पहिलीच ठरणार आहे. खासगी पुस्तकांवर अवलंबून राहवे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बालभारतीमधील अधिकार्यांशी चर्चा झाली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पुस्तके विद्यार्थ्यांसाठी तयार होणार आहेत.- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

धुळे जिल्हा परिषद विजयामागील सूत्रधार…