इथे लग्नाआधी द्यावी लागतेय कौमार्याची चाचणी

कौमार्य चाचणी विरोधात कंजारभाट समाजातील तरुण- तरुणींचा एल्गार

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात पंचायतीचा तिढा सुटलेला पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक असे समाज आहेत ज्यामध्ये अजूनही जात पंचायत बसवली जाते आणि याचा नाहक त्रास त्या त्या समाजातील तरुणांना होताना दिसत आहे. जात पंचायतीचा कायदा तयार झाला आहे तरीदेखील त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. जात पंचायातीविरोधात आता कंजार भाट समाजातील काही तरुण – तरुणी आता समोर आले आहेत. कोमार्य चाचणीची प्रथा बंद करावी अशी या तरुणांची मागणी आहे.कंजार भाट समाजामध्ये अजूनही लग्न झाल्यावर कौमार्य चाचणी घेतली जाते. कौमार्य चाचणी घेण्यासाठी सुरुवातीला जात पंचायत बसवली जाते आणि जात पंचायती मार्फत पैशांची मागणी केली जाते. यानंतर यांना लग्नाची परवानगी दिली जाते.

काय आहे कौमार्य चाचणी ?

मुलगी व्हर्जीन आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक समाजामध्ये कोमार्यची परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे कंजार भाट समाजामध्ये देखील कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा अजूनही चालू आहे. लग्न झाल्यानंतर त्या जोडप्याला एका रूमध्ये पाठवले जाते. त्यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाची बेडशीट दिली जाते. त्यांच्याजवळ असलेले टोकदार वस्तू, बांगड्या काढून घेतल्या जातात व त्यांना अर्ध्या तासासाठी एक बंदिस्त रूम मध्ये पाठवले जाते आणि संभोग करायला सांगितला जातो . तोपर्यंत जात पंचायतीचे पंच, मुलीचे आई व वडील त्या रुमच्या बाहेर बसतात. अर्ध्या तासानंतर त्या जोडप्याला बाहेर बोलावलं जात व त्यांनी दिलेली पांढऱ्या रंगाची बेडशीटवर जर रक्ताचे डाग पडले असतील तर ती मुलगी व्हर्जिन आहे की नाही हे ठरवले जाते. यानंतर पंच जो निर्णय देतील तो या जोडप्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मान्य करावा लागतो अन्यथा त्या जोडप्याला आणि कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत केले जाते.

याच कौमार्य चाचणी विरोधात आता कंजार भाट समाजातील काही सुशिक्षित तरुण- तरुणी पुढे आले आहेत. अश्या प्रथा बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यासाठी सोशल मिडीयावर याविरुद्ध मोहीम चालू केली आहे. #Stop The “V’Ritual या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये ७० ते ८० तरुण- तरुणी आहेत. सध्या व्हर्जिनिटी हा मुद्दा थांबवणे व कौमार्य चाचणी विरोधात एकत्र येण्याचा या ग्रुपचा उद्देश असल्याची माहिती या प्रथेविरुद्ध आवाज उठवणारे विवेक तमायचीकर यांनी दिली.

त्याचबोरबर इंस्टाग्राम वर देखील यांनी या प्रथेला ग्रासलेल्या तरुण- तरुणींना एकत्र आणण्याच काम करत आहे. या माध्यमातून ज्या मुलांना अश्या दृढ प्रथांना बळी पाडाव लागल आहे. त्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचा फोडली जाते. या प्रथा बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र अंदश्रद्धा निर्मलन समितीने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर जात पंचायत बसवन हे सामाजिक बहिष्कृत काद्यांतर्गत गुन्हा आहे. यासंदर्भात वेळोवेळी पोलीस स्टेशन रीतसर तक्रार दाखल करून देखील यासंदर्भात पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाहीये.

kanjar bhat jat

आमच्या समाजामध्ये जात पंचायतीच्या मार्फत कौमार्य चाचणी घेतली जाते. आम्हाल यासंदर्भात बाहेर आवाज उठवू नये म्हणून आमच्यावर दबाव टाकला जातो व समाजातून बहिष्कृत करू अश्या प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. आता आम्ही या प्रथेविरोधात सर्व तरुणी आणि तरुण पुढे आलो आहोत. ही प्रधा लवकरात लवकर बंद व्हावी अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी देखील अंचल सहकार्य करावे व केस दाखल करून घ्यावी अशी आमची मागणी आहे.
विवेक तमायचीकर ( तरुण, कंजार भाट समाज )

कंजार भाट समाजामध्ये लग्न झाल्यावर कौमार्य चाचणी घेतली जाते. जात पंचायती मार्फत कौमार्य चाचणी घेण हे सामाजिक बहिष्कृत कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जात पंचायती मधील पंच यासाठी पैसे घेतात. पाच हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत बोली लावली जाते. त्यामुळे या प्रथा बंद व्हाव्यात व पोलिसांनी देखील सहकार्य करून यासंदर्भात केस दाखल करावी अशी आमची मागणी आहे.
नंदिनी जाधव ( अंनिस, पुणे )

You might also like
Comments
Loading...