महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन

संघटनेची बदनामी केल्याचा गंभीर आरोप

टीम महाराष्ट्र देशा: पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावर पुणे राष्ट्रीय तालीम संघाने निलंबनाची केली आहे. यानंतर आता त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पत्राव्दारे सुचित करण्यात आले आहे

पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या विरोधात कृत्य करीत असल्याचा व तालीम संघाच्या विरोधात काम करत असलेल्या व्यक्तींना चिथावणी देऊन तालीम संघाची बदनामी करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप ठेवत  बाळासाहेब लांडगे यांच्यावर करण्यात आला आहे.  २१ दिवसापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसला कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्यामुळे राष्ट्रीय तालीम संघाने लांडगे यांना सदस्यपदावरुन निलंबित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याचे पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने देण्यात आले आहे.

या बद्दल ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना घटनेचे कार्याध्यक्ष योगेश दोडके म्हणाले कि, ‘ गेल्या वर्षभरात बाळासाहेब लांडगे हे  पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या विरोधात काम करत असल्याचा तक्रारी आल्या होत्या. या बाबाद त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता जोपर्यत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही.  तोपर्यंत संघटनेच्या पदाचा व नावाचा वापर करू नये तसेच चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात येईल’