पुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. त्यामुळे पुणेकरांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्तिथी झाली.
गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर आलं. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.