वाकडला दोन तोतया पोलिस अटकेत

पुणे: धनगर बाबा मंदिर समोर सार्वजनिक रोडवार थेरगाव पुणे येथे दोन ईसम थांबलेले असुन, ते लोकाना पोलिस असल्याचे सांगत आहेत.खाकी पैंट, ब्रावुन बूट  बेल्ट आणि वरती नार्मल शर्ट असा होता वेश धारण करुण तपासणी करत होते.त्यामुळे ते खरे पोलिस नसावेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
             दत्ता भिमराव टोणपे (वय.२८, रा मिलिंद नगर पिंपरी) व  राकेश मनोहर पवार (वय.२९, नढे नगर, काळेवाडी) या दोघां तोतया पोलिसांना वाकड पोलिसांनी काळेवाडी मेन रोड वर वाहने थांबवून खाकी पैंट, ब्रावुन बूट  बेल्ट आणि वरती नार्मल शर्ट असा वेश धारण करुण तपासणी करताना रंगे हात पकडले.
आपण कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात , आपले ओळखपत्र दाखवा असे विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवी ची उत्तरे दिली. त्यांना त्याब्यात घेऊन वाकड पोलीस ठाणे येते आणून त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता ते पोलीस नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात कलाम १७०, १७१, ३४ अनव्ये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.