क्षितिजाच्या पलीकडे जाऊन निभावत आहे माणुसकी, कहाणी पीपीई किटच्या आतल्या देवदूताची !

vijay salave

पुणे : क्षितिजाच्या पलीकडे जाऊन माणूसकी निभावत आहे. कोरोना मृतदेहाला अग्नि देत आहे. लोणावळ्यात पीपीई किटच्या आतला देवदूत अवतरलाय. गेली एक वर्षं ‘तो’ झटत आहे. रात्र-दिवस कोरोना साथीच्या महाभयंकर रोगात मृत्युमुखी झालेल्या रुग्णाला वैंकुठं लोकी सन्मानाने पाठवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतलीय, कोणाचा मुलगा होऊन तर कधी भाऊ, काका, पुतण्या, मामा आजोबांच्या रूपे साकारून आपलं कर्तव्य पार पाडत आहे. मावळ आणि लोणावळा परिसरातील 500 च्या जवळपास मृतदेहावर अंतिम संस्कार करणारा विजय साळवे सध्या चर्चत आहे.

लोणावळा नगरपालिकेत आरोग्य खात्यात काम करणारे विजय साळवे यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी दिली असता सुरवातीला त्यांच्या जीवाची घालमेल झाली होती तरी जीवावर उदार होऊन साळवींनी या कामाचे आव्हान स्वीकारले, मात्र काम तर हाती घेतलं पण मदतनीस कोणीच पुढे येत नव्हते. हळू हळू त्यानी सवंगड्यांना विश्वासात घेऊन आज पर्यंत पाचशेच्या आसपास कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यात सर्व धर्मीय मृतदेह होते. कोरोना काळात देखील मानव जातीच्या सेवेसाठी अनेक देवदूत पीपीई किटच्या आतून कार्यरत आहेत. मात्र, विजय साळवे नावाचा असाच एक देवदूत पर्यटन नगरीत आपली सेवा बजावत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मावळ प्रांत संदेश शिर्के,आणि लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या आदेशाने नगरपरिषद यांनी भुशीगाव स्मशानभूमी ही कोरोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवली. या स्मशानभूमीची संपूर्ण जबाबदारी विजय साळवे यांच्यावर सोपविली. त्यांच्या मदतीसाठी एक टीम देखील तैनात करण्यात आली. या कामाची संपूर्ण जबाबदारी ही विजय साळवे यांचीच असते. 24 तासात कधीही, मग ती मध्यरात्र असो वा पहाट असो किंवा दिवसभरात कोणतीही वेळ असो, एखादा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी साठी येणार असेल तर सर्वप्रथम त्याची माहिती विजय साळवे यांना दिली जाते.

माहिती मिळताच हाताखालील माणसं जमा करणं, अंत्यसंस्कारासाठी सरपण तसेच इतर आवश्यक समानाची जमवाजमव करणं, नगरपरिषदेमधून पीपीई किट आणणं, मृतदेह शववहिनी मधून उतरवून घेणे, सरपण रचणे, मृतदेहाला अग्निडाग देणं, जोपर्यंत मृतदेह संपूर्ण जळत नाही तोपर्यंत लक्ष देणे, सर्व झाल्यावर राख जमा करणं, नातेवाईकांना अस्थी जमा करून देणं ही सर्व काम विजय साळवी स्वतः कोणी सोबत असो वा नसो, अत्यंत जबाबदारीने करतात. विजय नावाप्रमाणे त्यांच्या कामाचा झंझावात सुरुये त्यामुळे अशी क्वचितच मुलखा वेगळी माणसं आपला ठसा उमटवून जागृत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP