वेल्हे पंचायत समितीवर मनसेची सत्ता आणणार-दसवडकर

वेल्हे दि १० (प्रतिनिधी) वेल्हे पंचायत समितीच्या चार आणि जिल्हा परीषदेच्या दोन जागा लढविणार असुन सर्वच जागा जिंकुन वेल्हे पंचायत समितीवर मनसेची सत्ता आणणार असे प्रतिपादन पुणे जिल्हा संघटक व पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष दसवडकर यांनी केला. वेल्हे तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेल्हे येथील मेंगाई मंदीर सभागृहात पदाधिकारी बैठक व नवनिर्वाचित निवड झालेल्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि मागील पंचवार्षिकमध्ये मनसेची ताकत कमी असताना देखील दोन सदस्य निवडुन आले होते.परंतु यावेळी मनसेची ताकत वाढली असुन सर्व जागेवर उमेदवार उभे करणार असुन सर्वच जागा जिंकणार आहे व पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकविणार आहे .तसेच या बैठकीत पुणे जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल संतोष दसवडकर,जिल्हा अध्यक्ष पदी पुन्हा अॅडव्होकेट रविंद्र गारुडकर यांची निवड तर जिल्हा सचिवपदी सचिन पांगारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रविंद्र गारुडकर,जिल्हा सचिव सचिन पांगारे,तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे,विद्यार्थी अध्यक्ष गोट्या गाडे,विंझरचे उपसरपंच सतीश लिम्हण,मार्गासनी ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळ इंगुळकर,अंकुश दसवडकर,संपत मोरे,गणेश दारवटकर तानाजी राजीवडे,विक्रम जगताप,रवी घाडगे,तालुका उपाध्यक्ष दिलीप तिडके,रामभाऊ राजीवडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे यांनी केले तर आभार गोट्या गाडे यांनी मानले.