विदयापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला

uni pune1

संदीप कपडे : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भोँगळ कारभाराचे प्रकरणे रोजच समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा पुणे विद्यापीठावर भरोसा नाही का ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच प्रयत्न ‘महाराष्ट्र देशाने’ केला आहे.

विद्यापीठाच्या हलगर्जी पणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सुद्धा सामोरे जाव लागत. विद्यापीठ प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एक प्रकरण मिटले की परत दूसरे प्रकरण विद्यापीठात पहायला मिळते. कित्येक निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठ दुर्लक्ष करते. मध्यंतरी एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही विद्यापीठाने त्यांना मार्कशीट वर गैरहजर दाखवले होते. असाच प्रकार खेड शिवापूर येथील फ्लोरा इंस्टीट्युट मधील 150 विद्यार्थ्यांसोबत सुद्धा झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला होता. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा रखडले होते. शहरातील 120 एमबीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चक्क एका वर्षांनांतर मार्कशीट देण्यात आल्या. छपाईसाठी कागद नसल्याचे कारण त्यावेळी विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते.

आता विद्यापीठाकडून सेटची परीक्षा दिलेल्या एकूण 2500 विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अपात्र ठरवले. यात विद्यार्थ्यांची चूक आहे म्हणून विद्यापीठाने हात झटकले आहेत. एकूण 69000 विद्यार्थ्यांनी सेटची परीक्षा दिली त्यापैकी 2700 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर 60 विद्यार्थी पात्र असून सुद्धा त्यांना तांत्रिक चुकांमुळे अपात्र ठरवले आहेत. या विरोधात शहरातील विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यापीठ दूजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. सेट परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा उत्तर पत्रीकेवर क्रमांक टाकतांना चूक झाली आहे तर ते पात्र कसे ठरले असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठ जर धुतल्या तांदुळा सारखे वागत असेल तर सध्या नेट परीक्षेचा अर्ज भरतांना येत असलेल्या तांत्रिक अडचणीला जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या चुकीमुळे मी सेट निकालात अपात्र ठरले आहे. विद्यापीठात चौकशी केली असता मशीन सप्लिमेँट नंबर रीड करत नाही असे सांगण्यात आले. आपण तांत्रिक बाबतीत येवढे अग्रेसर झलो तरी विद्यापीठात अश्या अडचणी येतात तरी कशा हा चींतेचा प्रश्न आहे. दिवस रात्र अभ्यास करून आमच्या वाटेला विद्यापीठाच्या चुकीमुळे अपयश येत. मुंबई विद्यापीठा सारखी परिस्थिति सध्या पुणे विद्यापीठात घडत आहेत. – सानिका घळसासी , विद्यार्थिनी

अनेकवेळा तक्रारकरूनही विद्यापीठ विदयार्थ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचारकरत नाही. या महिन्यातील हा चौथा प्रकार असून परीक्षा विभागाचाच गलथान कारभार सारखा समोर येत आहे. सेट विदयार्थ्यांच्या संदर्भात कुलगुरूंनी तात्काळ दखल घेतली नाही तर सोमवारी दी.21 पासुन विद्यापीठात ठिय्या आंदोलन करणार आहोत. – कुलदीप आंबेकर, यूवा प्रदेश सरचिटणीस जेडीयु

विद्यापीठातिल अधिकांऱ्यावर लक्ष ठेवायला कोणी नाही. त्यामुळे विद्यापीठात ढिसाळपणा दिसून येत आहेत. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा परिस्थिती . कित्येक वेळा आंसुधारत नाहीये. आंदोलन देखील केली आहेत तरी विद्यापीठाला जाग येत नाही आहे. – श्रीराम कंधारे, अभाविप विद्यापीठ प्रमुख