Exclusive विदयार्थी परीक्षेला ‘हजर ‘ मात्र विदयापीठाच्या ‘मार्कशीट’वर गैरहजर

savitribai fule pune university१

संदीप कापडे / पुणे : सावितीर्बाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.  एम आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात विदयार्थी परीक्षेला हजर असतानाही विद्यापीठाकडून मार्कशीटमध्ये गैरहजर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांचा निकाल नापास आला आहे.

savitribai fule pune university

( बी ई आय टी 2012 पॅटर्न) मे 2017 च्या परीक्षेत “elective lll mobile computing” या विषयात अंतर्गत परीक्षा व बाह्यपरीक्षकांनी या विदयार्थ्यांना मार्क देखील दिले आहेत. मात्र. विदयापीठाकडून मार्कशीटमध्ये गैरहजर दाखवण्यात आले. विदयार्थ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यापीठात संपर्क साधला. मात्र विदयापीठातील परीक्षा विभागातील शिक्षकांकडून उडवा उडविचे उत्तरे देण्यात येत आहेत . त्यामुळे विदयार्थी देखील आता हतबल झाले आहेत.

मार्कशीटवर नापास लिहून आले असल्याने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश देखील मिळत नाही . त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शैक्षणिक हे वर्ष वाया जाण्याची भीती सुद्धा आहे. परीक्षेत हजर असतानाही गैरहजर दाखवल्यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा  समोर आला आहे. सदर प्रकार जेडीयूने कुलगुरु समोर मांडला आहे. तसेच विदयापीठाकडून दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परीक्षा विभागाचा हा नेहमीचाच गलथान कारभार आहे.  निवेदन देवून हि काही फरक पडत नाही, विदयार्थ्यांच्या जिवनाशी खेळ खेळला जात आहे . सदर निष्काळजीपणात प्रशासनातील जे लोक जबाबदार असतील त्यांचावर कारवाई करण्यात यावी. तीव्र अन्यथा आंदोलन करण्यात  येईल -कुलदीप आंबेकर. प्रदेश सरचिटणीस युवा जेडीयु महाराष्ट् राज्य.

विद्यापीठाकडून परीक्षेत गैरहजर दाखवल्यामुळे आमच नुकसान होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना एम ई , एमबीए पुढील शिक्षण घ्यायाच आहे. पण मार्कशीट वर नापास लिहून आल्यामुळे आम्ही कुठेच प्रवेश घेऊ शकत नाही. विद्यापिठातील परीक्षा विभागात आम्ही चौकशी केली असता. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत – अक्षय पवार. विद्यार्थी एमआयटी कॉलेज 

मी आज विद्यापीठात हजर नव्हतो. मात्र झालेल्या प्रकाराबद्दल योग्य तो तपास करून योग्य निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल घेण्यात येईल. जर विद्यार्थ्यांच म्हणणं योग्य असेल तर त्यांच्या बाजूने निर्णय देऊ – डॉ, नितीन करमाळकर. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ