नागराज मंजुळेंवर विद्यापीठ मेहेरबान का ?

nagraj manjule vs pune university ground

टीम महाराष्ट्र देशा :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे  खेळण्यासाठीचे मैदान मराठी चित्रपटाचा सेट उभारण्यासाठी भाड्याने दिले आहे.नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने  नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला  आहे. चित्रपटाचा शूटिंग साठी सेट उभारण्यासाठी मैदानातच ‘जेसीबी’ मशीनने खोदकाम सुरू केल्याने मैदानाची मोठ्याप्रमाणावर दुरवस्था झाल्याचं समोर आलं आहे .

सैराट चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेला तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या  आगामी मराठी चित्रपटाचे शुटींग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मैदानात होणार असून  त्यासाठी केवळ साडेसहा लाख रूपयांचे शुल्क आकारून हे मैदान तब्बल दीड महिन्यांसाठी भाड्याने देण्यात आले आहे. दरम्यान या मैदानावर सेट उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी जेसीबी मशिनच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. यामुळे सर्व मैदानाचे विद्रुपीकरण झाले असून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थांनी केला आहे.

nagraj manjule vs university ground

विशेष म्हणजे सेट उभारणीचे काम सुरू असल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मैदानात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी येऊ नये म्हणून चक्क  ‘नो एंट्री’ चा बोर्ड लावला आहे. तसेच, मैदानात कोणी प्रवेश घेऊ नये, यासाठी बाउन्सर व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हे बाउन्सर व कर्मचारी मैदानात येणाऱ्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मैदानात येण्यास रोखतात. यासर्व प्रकारामुळे  विद्यापीठाचा  मनमानी कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी खेळायचे कुठे?  विद्यापीठ प्रशासनाचा सेट उभारण्यांच्या कारभारावर नियंत्रण नाही का? विद्यापीठांकडे पैशांची कमी आहे का? मंजुळे हे माजी विद्यार्थी असल्याने त्यांना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात येत आहे का, असे असंख्य प्रश्न विद्यार्थांनी उपस्थित केले आहेत.

विद्यार्थी संघटनांच्या प्रतिक्रिया

Loading...

विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नागराज मंजुळे यांच्या फुटबॉल विषयाशी संबंधित आगामी चित्रपटासाठी सेट उभारण्याचे काम मैदानात सुरू आहे. माजी विद्यार्थी असल्याने त्यांना सुमारे दीड महिन्यांसाठी साडेसहा लाख रूपयांमध्ये हे मैदान भाड्याने दिले आहे. करार करताना मैदान सुस्थितीत करून देण्यात येईल, असे लिहून घेतले आहे. त्यामुळे मैदान सुस्थितीत परत मिळणार आहे.-डॉ. ए. डी. शाळिग्राम, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या मैदानाचा चालू असलेला दुरुयोग विद्यापीठाने त्वरित थांबवावा .आम्ही या सर्व प्रकारची सखोल चौकशीची मागणी करत आहोत त्याच बरोबर विद्यापीठाने देखील जी मेहरबानी दाखवली आहे त्याचा पुनर्विचार करावा अशी आम्ही विनंती करत आहोत केवळ माजी विद्यार्थी असल्याने जर हि परवानगी दिली जात असेल तर ते चुकीचे आहे .-राकेश कामटे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Loading...

नागराजवर जी मेहरबानी होत आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यापीठाच्या कुलगुरूंची आम्ही भेट घेणार असून याची चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत.विद्यापीठाने ज्याप्रमाणे नागराज माजी विद्यार्थी आहे हे सांगत त्यांना परवानगी दिली तशी परवानगी इतर विद्यार्थ्यांना त्यांचे खाजगी कार्यक्रम घेण्यासाठी विद्यापीठ देणार का ? -किरण साळी,युवसेना शहराध्यक्ष

Loading...

नागराज मंजुळे यांच्या सामाजिक कामाबद्दल आम्हाला आदर आहे मात्र विद्यार्थ्यांच्या मैदानावर विद्यार्थ्यांचा हक्क आहे.अशाप्रकारे मैदानावर कब्जा करणे चुकीचे आहे एक दोन दिवस शुटींग असते तर आम्ही समजू शकलो असतो मात्र दीड महिना शुटिंगसाठी मैदान का दिलं गेलं? हे अनाकलनीय आहे -नसीर शेख एस एफ आय

कोणत्याही कलाकृतीला आमचा विरोध नाही मात्र विद्यार्थ्यांना मैदानावर जाण्यापासून रोखणे हा अन्याय आहे .नागराजवर विद्यापीठ का मेहेरबान आहे? तसेच यामध्ये काहीजणांचे आर्थिक हितसंबध जपले गेले आहेत का? याची चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत . हे काम त्वरित न थांबविल्यास आम्ही शुटींग उधळून लाऊ  तसेच आमच्या स्टाईने आंदोलन करू – मंदार जोशी,नेते  ,आर. पी. आय.