चित्रीकरणासाठी मैदान दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत

savitribai fule pune university१

पुणे  : सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता आहे.सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला आहे.

Loading...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना एका हिंदी सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सेट उभारण्यास मैदान भाड्याने दिले आहे. यामुळे विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचं तहसील कार्यालयाने म्हटले आहे.

नागराज मंजुळेंवर विद्यापीठ मेहेरबान का ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे  खेळण्यासाठीचे मैदान मराठी चित्रपटाचा सेट उभारण्यासाठी भाड्याने दिले आहे. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने  नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला  आहे. चित्रपटाचा शूटिंग साठी सेट उभारण्यासाठी मैदानातच ‘जेसीबी’ मशीनने खोदकाम सुरू केल्याने मैदानाची मोठ्याप्रमाणावर दुरवस्था झाल्याचं समोर आलं आहे .Loading…


Loading…

Loading...