रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाच्या पाहणीत पुणे विद्यापीठ नापास

uni pune

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणवणाऱ्या आणि उर भरून येईल अशी बिरुदे मिरवणाऱ्या सावित्राबाई फुले विद्यापीठाला रोजगारभिमुख विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत स्थानही मिळवता आलेले नाही. तसेच मुंबई विद्यापीठ सोडता राज्यातील यात एकही विद्यापीठ नाही.

देशातील दहावे आणि राज्यातील पहिले असलेल्या पुणे विद्यापीठला ‘क्यूएस’ या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत स्थानच नाही. या संस्थेकडून नुकतीच विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगारानुसार ‘रोजगारक्षम विद्यापीठांची’ जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. जगातील पाचशे विद्यापीठांची यादी या संस्थेने जाहीर केली. देशात अव्वल स्थानी असल्याचे सांगणाऱ्या पुणे विद्यापीठाला या क्रमवारीत स्थानही मिळालेले नाही. म्हणजेच विद्यापीठातील पदवीधरांना नोकरी मिळेल असे शिक्षण देण्याच्या जागतिक स्पर्धेत विद्यापीठ जगातील पाचशे विद्यापीठांमध्येही नाही. विद्यापीठातील पदवीधरांना मिळणाऱ्या नोकऱ्या , मिळालेल्या नोकरीचा दर्जा, नोकरी देणाऱ्या कंपन्यांचा दर्जा तसेच माजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्या आणि त्याचा दर्जा अशा निकषांवर क्रमवारी निश्चित करण्यात आली.

विद्यार्थांना रोजगार मिळावा म्हणून विद्यापीठ प्रयत्नशील आहे का ? कंपन्यांशी करार, विद्यार्थी आणि कंपन्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न हे देखील पाहण्यात आले. या सर्व पाहणीत पुणे विद्यापीठ दर्जाहीन दिसून आले आहे. चांगली नोकरी मिळावी म्हणून विद्यार्थी सतत प्रत्नशील असतात मात्र विद्यापीठाकडून कोणतीच दखल घेण्यात येत नाही हेच वास्तव आहे.

 

 

 

 

 Loading…
Loading...