आता प्रवेश परीक्षा होणार ऑनलाईन ; पुणे विद्यापीठ प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : येत्या शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील पदव्युत्तर आणि पदवीसाठी जी एन्ट्रान्स एक्झाम घेण्यात येत होती, ती ऑनलाईन घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे.

Loading...

ही परीक्षा महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही घेतली जाणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिले जाणार आहेत.

पुणे विद्यापीठात दरवर्षी हजारोंच्या संख्येने प्रवेश अर्ज येतात. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची खुप धावपळ होते. विद्यापीठातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये ८० हून अधिक पदवी व पदव्युत्तर तर सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. ऑनलाईन प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थांना जवळच्या आणि सोयीच्या शहरामध्ये परीक्षा देणे शक्य होईल. प्रवेश तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हा महत्पुर्ण निर्णय घेतला आहेLoading…


Loading…

Loading...