खरेदीसाठी महिलांची पुन्हा झुंबड उडणार, १ जूनपासून तुळशीबाग होणार सुरु

tulshi-baug

पुणे : लॉकडाऊन ४ हे ३१ मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग पूर्ववत सुरु होत आहे. महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती.

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी दुकानांची साफसफाई सुरु केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 ते 18 मार्च या कालावधीत तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला होता. त्यानंतर राज्यात संचारबंदी आणि केंद्राने लॉकडाऊन जरी केला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद होती.

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरु करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांचे तापमान तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली.

जगातील सगळ्यात खोटारडा पक्ष म्हणून भाजपाचे नाव गिनीज बुक मध्ये सामिल करा : सचिन सावंत

दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि कॉरेंटाईन सुविधा या बाबींची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारच्या पॅनलने मोदी सरकारला लॉकडाऊनबाबत काही शिफारशी केल्या आहेत. यापुढे लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी शिफारस केल्याचं वृत्त ईटीने दिलं आहे. लॉकडाऊन ४ हे ३१ मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच या पॅनलने सरकारसमोर एक्झिट प्लॅन सादर केला आहे.

या दोन पॅनलने सरकारसमोर लॉकडाऊन ४ मधून बाहेर पडण्याचा प्लॅन सादर केला. कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या असलेले नियम तसेच रहावेत, किंबहुना त्यापेक्षा ते कडक केले जावेत, तर उर्वरित भाग खुला करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह आणि धार्मिक स्थळे बंद ठेवावीत. इतर सर्व बंधने काढून टाकावी, अशी शिफारस पॅनलने केल्याचं ईटीला सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.

लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजेना,’या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘जनता कर्फ्यू’