पिरंगुटजवळ भरधाव ट्रकने ५ जणांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पिरंगुट घाट उतारावर भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. भरधाव ट्रकनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच वैष्णवी सुनील सोनवणे (वय 20, सध्या रा. पौड, ता. मुळशी), पूजा बंडू पाटील (वय 17, सध्या रा. पिरंगुट, ता. मुळशी), नागेश अंकुश गव्हाणे (वय 21, सध्या रा. पिरंगुट, मूळ रा. कागडखेल, ता. आष्टी. जि. बीड) व एक अनोळखी तरुण (अंदाजे वय 20) हे चौघे मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घाबरला आणि घटनास्थळावरून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पण सतर्क वाहतूक पोलिसांनी या ट्रक चालकाला घोटावडे फाटा येथे पकडलं. ट्रकचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या