पुण्यातून बाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पास लागणार का ? वाचा ही महत्वाची बातमी

mumbai pune expressway

पुणे : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे पहिल्या ४ लॉकडाउनमध्ये पुण्यातील चाकरमान्यांनी पुणे सोडण्याला प्रधान्य दिल होत. मात्र आता पाचव्या लॉकडाउनमध्ये हळूहळू ऑफिसेस सुरु होण्यास सुरवात झाली आहे. तसे पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र पुण्यात येताना वा पुण्यातून बाहेर जाताना पोलिस पासची गरज आहे की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, पुणे जिल्हा अंतर्गत, पुण्याबाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पोलिस पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरात अद्याप नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा आणि परिसरात बारामती, इंदापूर, वालचंदनगर याच ठिकाणी एसटी सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही.

…तर अक्षय बोऱ्हाडेला उलटा टांगून मारणार; 3 एकर जमीन, दुकान, वडिलांच्या नोकरीमध्ये सेटलमेंट केल्याचा आरोप

पर्यायाने नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. अशावेळी प्रतिबंधित क्षेत्रांमधील नागरिक इतरत्र प्रवास करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुण्यातील प्रवासासाठी पास काढणे गरजेचे आहे.

पास कोणत्या कारणासाठी काढण्यात येत आहे तसेच संबंधित वाहनातून किती प्रवासी प्रवास करणार आहे. याबाबत पूर्वी असलेले नियम कायम राहणार आहेत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. पुण्यात येण्यासाठी किंवा पुण्यातून बाहेर जाण्यासाठी अद्याप पूर्णतः वाहतूक खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासाबाबत पूर्वीचे जे नियम आहेत तेच पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहेत. आत्तादेखील पास मिळण्यासाठी अनेक अर्ज आलेले आहेत. छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात येत आहे. असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले आहे.

भाजपने सुरु केली निवडणुकीची तयारी, शाह घेणार ८ जूनपासून ऑनलाइन बैठका