Pune to Ladakh ‘Skill Tour’- माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य शिक्षणाच्या प्रसारासाठी पुणे ते लद्दाख’ स्किल यात्रा’

लेंड-ए-हॅन्ड इंडिया तर्फे देशभरात 'स्किल ऑन व्हील' संकल्पनेतून कौशल्य विकास शिक्षण प्रसार यात्रा.

पुणे दि. १४  जुलै : भारतीय अर्थव्यवस्था ही प्रचंड जोमाने आणि तेवढ्याच सामर्थ्याने वाढत आहे. मात्र त्याच वेळी आवश्यक कौशल्य आणि त्याच्या शिक्षणाचा अभाव ही बाब अडथळा ठरत आहे. या जागतिक युवा कौशल्य दिवसाच्या (१५ जुलै २०१७) पार्श्वभूमीवर कौशल्य शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ‘लेंड-ए-हॅन्ड इंडिया’ या पुणे स्थित सामाजिक संस्थेने पुणे ते लद्दाख ‘ स्किल ऑन व्हील्स’ ‘स्किल यात्रा’ कार्यक्रम राबविला. हि ‘स्किल यात्रा’ राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) अंतर्गत ‘मल्टीस्कील फौंडेशन कोर्स’ (माध्यमिक शालेय व्यावसायिक अभ्यासक्रम ) या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विविध जीवन कौशल्यांचे जसे वेल्डिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग, प्लम्बिंग(नळकाम), बागकाम,अन्न प्रक्रिया इत्यादीचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणानिशी सुसज्ज अशा बसद्वारे ही यात्रा ६००० की.मी प्रवास करून आली आहे.

मागील १२ वर्षात १० राज्यात माध्यमिक शाळांमधील कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून लेंड-ए-हॅन्ड इंडियाने  उपलब्ध असलेले पारंपारिक शिक्षण तसेच कौशल्य शिक्षणाची खऱ्या आयुष्यात गरज या दरीबाबत काम केले असून या  ‘स्किल ऑन व्हील’ स्किल यात्रेच्या माध्यमातून या दरीवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले. सध्या लेंड-ए-हॅन्ड इंडिया पुणे महानगरपालिकेच्या १० शाळांमध्ये राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) अंतर्गत तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA) आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने NSDC approved ‘मल्टीस्कील फौंडेशन कोर्स’ शिकवते आहे.

या स्किल इंडिया यात्रेची सुरुवात पुण्यातून करण्यात आली होती तर लेह लद्दाख येथे हि यात्रा समाप्त करण्यात आली. ३ इडियट्स या चित्रपटात चित्रित करण्यात आलेल्या आणि रँचो हे शाळेत पात्र ज्या शाळेत शिक्षण घेताना दाखविण्यात आले त्या ‘द्रुक पदमा कर्पो स्कूल’ (“Druk Padma Karpo School”) शाळेला यात्रेदरम्यान भेट देण्यात आली. सुश्री सोनम वांगचुक यांनी या यात्रेचे लडाख येथे स्वागत केले. (३ इडियट्स चित्रपटातील खरे पात्र). दरम्यान,  स्किल यात्रेदरम्यान भोपाळ. दिल्ली, चंदीगड,श्रीनगर, द्रास, कारगिल, लेह, जयपूर, गांधी नगर आणि मुंबईतील मंत्रालय या ठिकाणी विविध शाळा, प्रशासन आणि शैक्षणिक विभागाला भेटी दिल्या.  दरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या ‘स्किल यात्रा’ ची नवी दिल्लीत प्रशंसा केली . तसेच  केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी याची नवी दिल्ली येथून झेंडा दाखवूंन या यात्रेचा शुभारंभ केला.

दरम्यान पुणे येथे पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती शीतल उगले यांनी पुण्यातून या स्किल यात्रेचा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सोबतच देशभरात हरयाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री पी. के. दास, राजस्थान सरकारचे मुख्य सचिव श्री नरेशपाल गंगवार, जम्मू काश्मीरचे प्रकल्प संचालक श्री तुफाईल मत्तु, मध्य प्रदेशच्या राज्य प्रकल्प सहाय्यक अधिकारी श्रीमती शिल्पा गुप्ता.पीएसएससीआयव्हीई भोपाळचे सहसंचालक डॉ. राजेश खंबायत , एनएसडीसीचे श्री जयंत कृष्ण, गुजरातचे राज्य प्रकल्प सहसंचालक श्री दिनेश पटेल यांनी त्या त्या टप्प्यावर पुढील प्रवासासाठी स्किल यात्रेचा शुभारंभ केला.

दरम्यान या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी मंत्रालय  येथे या स्किल यात्रेचे स्वागत केले. शासनाच्या मदतीने संपूर्ण देशभरात स्किल इंडियाचा शैक्षणिक हेतू साध्य झाल्याबद्दल या वेळी संस्थेतर्फे मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

लेंड-ए-हॅन्ड इंडिया संस्थेचे सह संस्थापक आणि संचालक श्री राज गिल्डा यांनी यावेळी सांगितले कि, ” भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत कौशल्य शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे.व्यवसायांमध्ये वैयक्तिक, व्यावसायिक आणि अर्थव्यवस्थेची वाढ दर्शविणारे कौशल्य हे नवे चलन म्हणून उदयास येत आहे. भौगोलिक समस्यांमुळे दुर्गम भागातील कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणा दरम्यान योग्य संतुलन टिकवून ठेवण्यात भारताला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी हे अंतर दूर करण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षणासह व्यावहारिक शिक्षण एकत्रित करण्यासाठी लेंड-ए-हॅन्ड इंडियाद्वारे स्किल यात्राच्या माध्यमातून सक्रिय उपाय योजना करणे महत्वपूर्ण आहे. आपल्या सीएसआरच्या पुढाकाराचा भाग म्हणून या अद्वितीय कौशल्य यात्रा प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही बजाज ऑटोचे आभारी आहोत “. असे सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.

तसेच लेंड-ए-हॅन्ड इंडिया संस्थेच्या सह संस्थापिका आणि संचालिका सुनंदा माने म्हणाल्या कि,  ” आतापासून ते सन २०५० पर्यंत दरम्यान  भारतात किमान 280 दशलक्ष रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. सध्या भारतात 36 दशलक्ष बेरोजगार तरुण आहे  त्यापैकी 24 लाख गावांमध्ये राहतात आणि रोजगारांच्या शोधात शहरांकडे बरीच लोक येतात. शालेय शिक्षण आणि संधी,  पूर्ण क्षमतेने कौशल्य मिळवणे हे युवकांमध्ये बेरोजगारीचे एक प्रमुख कारण आहे. रोजगाराच्या माध्यमातून कमावणे आवश्यक असताना असुरक्षितता हि दूर करून यांच्यातील दुवा जोडणे. तसेच कौशल्य शिक्षणाच्या विकासाला हातभार लावणारे कौशल्य निर्माण करणे हे बजाज ऑटोने दिलेल्या पाठबळामुळे शक्य होणार आहे. बजाज ऑटो स्किल यात्रेचा एक भाग आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या वाढीच्या आणि प्रगतीसाठी भागीदार बनल्यामुळे खूप आनंदी आहो.” असेही माने यावेळी म्हणाल्या.

………………………………………………………………..

अधिक माहितीसाठी संपर्क Lend-A-Hand NGO,

http://www.lend-a-hand-india.org/

visit: http://skillsonwheels.org.in/

जनसंपर्क : गणेश दळवी  / ९९२११५२४५०

[email protected]

Comments
Loading...