fbpx

नदी पात्रातील रस्ता सुरू राहणार, भाजपच्या कार्यक्रमामुळे ‘महामेट्रो’ पडले तोंडावर

पुणे : नदीपात्रातील मेट्रोच्या कामासाठी भिडे पूल ते रजपूत झोपडपट्टीकडे जाणारा नदीपात्रातील रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी रात्री उशीरा मागे घेण्यात आला. आज रात्रीपासून सोमवारी सकाळी पर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार होता. तसे फलकही महामेट्रोकडून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले होते.

मात्र, शनिवारी भाजपच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तसेच राष्ट्रीय नेते पुण्यात येणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार हा रस्ता सुरूच ठेवला जाणार असल्याचे महामेट्रोकडून रात्री उशिरा कळविण्यात आले आहे. आता हा रस्ता 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवला जाईल. दरम्यान, भाजपच्या कार्यक्रमामुळेचं महामेट्रोला आपले काम पुढे ढकलावे लागले असल्याची चर्चा असून भाजपच्या कार्यक्रमामुळे ‘महामेट्रो’  तोंडावर पडले असल्याचे आता बोलले जात आहे.