पुणे : २९ दिवसांत तब्बल २२,१७२ जण रूग्ण ठणठणीत झाले बरे

corona virus

पुणे  – शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त  होणाऱ्यांचे  प्रमाण वाढत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत तब्बल १० हजार ४५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, जुलैमध्ये अवघ्या २९ दिवसांत तब्बल २२,१७२ जण रूग्ण ठणठणीत बरे झाले. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण समाधानकारक ठरत आहे.

पुणे शहरात ९ मार्चला पहिला बाधित सापडल्यानंतर ३० जूनपर्यंत १ लाख १५ हजार ९९० संशयितांच्या केलेल्या तपासणीतून शहरात एकूण १७ हजार २८८ बाधित सापडले. तर ६४३, जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जुलैपासून ५ ते ६ हजार संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यामुळे जुलैपासून खNया अर्थाने कोरोनाचा उद्रेक झाल्याने बाधितांची संख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. आत्तापर्यंत तब्बल २ लाख ६१ हजार संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर, शहरातील एवूâण कोरोना बाधितांची संख्या ५१,७३८ वर पोहोचली आहे. त्यात १८ जुलैला उच्चांकी १,८३८ बाधित सापडले.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांच्या चाचण्यांची संख्या काहीशी कमी झाल्याने मागील काही दिवसांत बाधितांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दोन हजारांच्या जवळपास पोहोचलेल्या रूग्णसंख्येत चारशे ते पाचशे ने घट झालेली दिसत आहे. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बाधितांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत असून, दिवसाला किमान ५०० ते ८०० च्या वर रूग्णांना डिस्चार्ज देण्यात येत होता. त्यात २९ जुलैला उच्चांकी २,५४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे ही बाब काही अंशी समाधानकारक मानली जात आहे.

मार्च ते जूनपर्यंत शहरात दिवसाला किमान १० ते १५ मृत्यू शहरात होत होते. मात्र, १९ जुलैला ४१ उच्चांकी मृत्यू शहरात झाले. जुलै २९ पर्यंत ६११ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू होणाऱ्या  रूग्णांना प्रामुख्याने उच्च रक्तदाब, श्वसनविकार, न्यूमोनिया, मधुमेह, अवयव निकामी होणे अशा गंभीर आजारांसह कोरोनाची लागण झाली होती. त्यात वयोवृध्द रूग्णांबरोबरच इतर वयोगटातील रूग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे”, सुप्रिया सुळेंनी सांगितली टोपेंच्या मातोश्रींची आठवण…

तडीपारीच्या नोटिशीनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार,मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा