पुण्यातील दोन विद्यार्थ्यांवर नागपुरात हल्ला, एक गंभीर

one sided love crime

पुणे  : पुणे येथील नॅशनल लॉ स्कुलच्या दोन विद्यार्थ्यांवर नागपुरातील गुंडाने चाकूने हल्ला केला. रुचिर बत्रा आणि विभा तुमकीकर असे या दोन विद्यार्थ्यांची नावे असून ते स्टडी टूरसाठी कोलकात्याला जाणार असल्याने नागपूरला आले होते.

जेवणासाठी वाडी भागातील एका हॉटेलमध्ये हे विद्यार्थी गेले होते. यावेळी तेथे यश गावंडे हा गुंड आपल्या मित्रांसोबत जेवायला बसला होता. धक्का लागल्यावरुन सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तेवढ्यात यश गावंडे याने चाकू काढून रुचिर बत्राच्या छाती आणि पोटावर वार केले. त्याला वाचवायला विभा तुमकीकर धावला. यावेळी यशने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी यश गावंडे हा भारतीय युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.