पालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दरांचे धाबे दणाणले ! 

टीम महाराष्ट्र देशा : पुणे महापालिका प्रशासनानं मुख्य इमारतीसह स्वमालकीच्या विविध इमारतीत घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पालिकेनं पाच जणांचं स्वतंत्र पथक स्थापन केलं असून अस्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दीडशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकांना दिले आहेत. या शिवाय क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत असं पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भारतातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकवल्यानंतर पुणे महापालिका शहराच्या स्वच्छतेबद्दल अधिकच सतर्क झाल्याचे दिसत आहे. आधी रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड आणि स्वतः हाताने साफ करण्याची शिक्षा दिल्या नंतर आता प्रशासनाने आपला मोर्चा आता आपल्या इमारातींकडे वळवला आहे. त्यामुळे पालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Latur Advt
You might also like
Comments
Loading...