शिवापूर येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन.शाळा व महाविद्यायलयतील विद्यार्थ्यांची गर्दी

शिवापूर दि.5- येथील आयोजित शिवकालीन शस्त्रास्र प्रदर्शनाला पुणे व शिवगंगा खोऱ्यातील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थांनी भेट देऊन पहिणी केली.या प्रदर्शनामुळे पुन्हा ऐकदा इतिहास जागा झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.शिवगंगा खोऱ्यात् आज ही ऐतिहासिक वास्तु आहेत.सिंहगड किल्ला व परिसरातील ऐतिहासिक वस्तु पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोप्रातुन हजारो पर्यटक या परिसरात येत असतात.राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज सन 1637 साली खेडेबारे मावळातील खेड़ शिवापूर या भागात वास्तव्यास होते.या गोष्टीला 380 वर्ष पूर्ण होत असून याचे औचित्य साधुन याठीकाणी सलग तीन दिवस  कोंडे-देशमुख प्रतिष्ठाण,शिवराज प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवापूर ( ता.हवेली ) येथील अलंकार मंगल कार्यलयात शिवकालीन शस्रास्रांचे प्रदशर्न   भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात भाले,मराठा धोफ,तोफ गोळे,ढाल,विविध प्रकारच्या तलवारी,बाण,अदि 350 प्रकारची शस्रास्र ठेवण्यात आली होती.या प्रदर्शनाचे उदघाटन लखोजी राजे जाधवराव यांचे सोळावे वंशज श्री.अमरसिंह उदयसिंह जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खेड़ शिवापुरचे माजी सरपंच,व जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे,प्रमोद कोंडे,गणपत खाटपे,आदिनाथ जरांडे,योगिराज कोंडे,अनिरुध्द यादव,विकास कोंडे,अनिकेत कोंडे,अक्षय कोंडे,युवराज कोंडे,गौरव खाटपे,सूरज खाटपे,ओमकार कोंडे,समीर कोंडे,भूषण कोंडे,बंटी खाटपे,राहुल कोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोंडे-देशमुख प्रतिष्ठानने शिवगंगा खोऱ्याच्या  इतिहासाला उजाळा देण्याचा हा छोटासा  प्रयत्न करताना शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. भागातिल जिल्हा परिषद शाळा तसेच शिवभुमि विद्यालयातील  विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रथमच अशा प्रकारची  शस्त्रे पाहिल्यामुळे  त्यांना खुप आनंद झाला. त्या शस्त्रांमध्ये मराठा तलवार, रजपूत तलवार,गुर्ज तसेच धोप,ढाल,भाले,विछवा,वाघनखे,आशा 96 प्रकारचि वेगवेगळि शस्त्रे ह्या ठिकाणि उपलब्ध  करून देणारे निलेश आरूण सकट ह्यांचा सन्मान कोंडे-देशमुख प्रतिष्ठान च्या वतिने करण्यात आला.
शिवगंगा खोर्यातिल प्रत्येक वक्ति, तरूण,महिला,भगिनि लहान मुलांन पर्यत हा इतिहास पोहचावा या उद्देशाने  हा उपक्रम राबवला असे कोंडे-देशमुख प्रतिष्ठान  वतिने सांगण्यात आले.
या प्रदर्शनास पुणे तसेच शिवगंगा खोरे परिसरातील शाळा व महाविद्यालयतील विद्यार्थी,विद्यार्थीनिंनि तसेच परिसरातील नागरिकांनी भेट दिली. या वेळी शस्रास्र अभ्यासक निलेश सकट ( कोपरखैराने ) यांनी माहिती दिली.