खडकवासला धरण १०० टक्के भरले, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

blank

पुणे – पुणे शहरात मागील आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

या चार धरणांपैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले असून या धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे झेड ब्रीज खालील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हे दृश्य पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

blank

नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे. सदर भागात मनपाच्या वतीने सूचना फलक लावले असून मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी नदीपात्रातील रस्ते वाहतूकीस वापरू नयेत, या रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, उभी केलेली वाहने सुरक्षित जागी लावावीत अशी सूचना करण्यात आली आहे.

मी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन !

आमचं सरकार आल्यावर खेकडयामुळे धरण फुटणार नाही, अजितदादांचे आश्वासन