रस्त्यावर फटाके वाजविण्यास पोलिसांकडून बंदी

पुणे – सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावर फटाके उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली असून या संदर्भात पुणे शहर पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (यु ) अन्वये, कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारू काम सोडणे किंवा फेकणे अथवा फायर बलून किंवा अग्निबाण सोडणे, फटाका उडविण्याचा जागेपासून चार मीटर अंतरावर 125 डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन विक्री व वापरास तसेच ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...