fbpx

पुण्यामध्ये डीजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई; मिक्सर केला जप्त

Maharashtra-Police

पुणे : पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉल्बीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यानेच होणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला आहे.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंडईतील टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ केला.

दरम्यान कोल्हापुरमध्ये सुद्धा शाहुपुरी पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. डीजे सेट जोडणीसाठी घेऊन जात असलेल्या ४ बेस आणि ४ टॉप पोलिसांनी जप्त केले आहे. , पोलिसांनी जप्तीची कारवाई करत पोलिसांनी गणेश मंडळाना कडक संकेत दिले आहेत.