एल्गार परिषदेचे आयोजक कबीर कलामंच आणि रिपब्लिकन पँथरवर पोलिसांच्या धाडी

पुणे: 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाड्यावर आयोजित एल्गार परिषदेच्या आयोजनात अग्रभागी असणारे कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या पुणे, मुंबई तसेच नागपूर कार्यालय आणि घरांवर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.

कबीर कला मंचचे रमेश गायचोर, सागर गोरखेच्या वाकडमधील घरावर पुणे पोलसांनी धाड टाकली आहे, तर मुंबईत सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या घरी देखील चौकशी केली जात आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यामध्ये विविध आंबेडकरवादी संघटनाकडून एल्गार परीषदेच आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली होती. या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या हिंसाचाराच्या विरोधात ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता.

दरम्यान, एल्गार परिषदेवेळी अनेक वक्त्यांकडून चिथावणी खोर भाष्य केले गेल्याचा आरोप करत 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचचे चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद याचा विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...