fbpx

नियम लावणारे पोलीस मगणेशमंडळांना २५ ढोल-५ ताशे असा शिदींना एकच भोंगा-२ नमाज नियम लावतील का ?

मुंबई : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल पथकांची संख्या अधिक असल्याने विसर्जन मिरवणुकीला खूप अवधी लागतो, असे कारण देत पुणे पोलिसांनी सर्व गणेश मंडळांनसाठी फतवा काढला आहे. एका मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी २५ ढोल आणि ५ ताशे असलेले एक पथक ठेवण्याची मर्यादा घातली आहे. तसेच केवळ मानाच्या गणपतींसाठी अशी दोन पथके असावीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली आणि विसर्जन मिरवणुकांना वेळ लागतो, या कारणांमुळे मिरवणुकांवर बंधने घालणारे पोलीस ३६५ दिवस मशिदींवरील भोंग्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी असे निर्बंध का घालत नाहीत ? सकाळी ६ पूर्वी होत असलेल्या कर्णकर्कश्श अजानवर कारवाई करण्याचे न्यायालयाने अनेकदा आदेश देऊनही पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली आहे ? पोलीस मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला घाबरतात का ? जर मंडळांना २५ ढोल-५ ताशे अशी मर्यादा घातली जाणार असेल, तर मशिदींवर एकच भोंगा आणि दोनच नमाज असे निर्बंध पोलीस घालतील का, असा परखड प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना केला आहे. गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध आहे. समिती गेली १५ वर्षे गणेशोत्सवांत डीजेवर पूर्ण बंदी घालावी, मिरवणुकांत मद्यपान करून सहभागी होऊ नये, मंडपांत जुगार खेळू नये, श्री गणपतीसमोर १० दिवस अश्‍लील गाणी लावू नये, हिडीस अंगविक्षेप करत नाचू नये आदींविषयी प्रबोधन करत आहे. मात्र आता उत्सवांतील पारंपारिक वाद्यांवरही निर्बंध आणले जाणार असतील, तर हिंदु उत्सवांवर केल्या जाणार्‍या धार्मिक पक्षपाताविषयी सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्रितपणे विरोध करतील. सर्व मंडळांना एक न्यायाची भाषा करणारे धर्मनिरपेक्ष पोलीस सर्व धर्मांना एक न्याय कधी देतील ? रात्री १० नंतर लाऊडस्पीकर बंद करून सर्व गणेश मंडळे ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळतात, विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही रात्री १० नंतर सर्व मंडळे वाद्ये बंद करतात. याचा अर्थ हिंदू कायद्याचे पालनच करतात. सर्व मंडळांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही समिती करते; मात्र याचा अर्थ हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा ही काँग्रेसी वृत्तीची बंधने भाजप शासन काळातही हिंदूंवर लादण्यात येत असतील, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. पुणे पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांनी या निर्बंधांवर पुर्नविचार करावा आणि सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करतांनाच कोणत्याही प्रकारचा धार्मिक पक्षपात आम्ही सहन करणार नाही, अशी चेतावनीही समितीने दिली आहे.

1 Comment

Click here to post a comment