video:बिल्डर देवेन शहांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

pune-police-detained-killers-of-pune-bulider-deven-shah-murder

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर देवेन शहा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल आहे. शनिवारी ( दि १३) रोजी देवेन सहा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. रवी चोरगे आणि राहुल शिवतारे अशी मारेकऱ्यांची नावे असून ते रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

देवेन शहा याचं डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर घर आहे. शहा यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवरुन आलेल्या दोन इसमांनी शहा यांच्यावर एकूण पाच गोळ्या झाडल्या होत्या. ते पळून जाणाऱ्या हल्लेखारांचा पाठलाग करणाऱ्या बिल्डरच्या मुलावरही पिस्तूल रोखण्यात आले. शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहा यांच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमे-यात हत्येचा सर्व थरार कैद झाला असून यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.

पुणे शहरातील बांधकाम व्यवसायीकांना या आधीही धमकावण्याचा तसेच हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. आता देवेन शहा यांच्या हत्येमागे एखद्या गॅगंकडून खंडणी मागण्याचे कारण आहे कि इतर देवान – घेवाणीचे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.