पुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

bjp vr congress

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी निगडीत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पुणे पोलीस दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणात ज्या हायप्रोफाइल कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाइल क्रमांक मिळाला आहे. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांकडून हे पत्र जप्त करण्यात आल्याचा पुणे पोलिसांनी दावा केला आहे.

दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचारातमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत यांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेलीअसून सर्वोच्च न्यायालयाने कोरेगाव-भीमा हिंसाचार संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत?, असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा या मागचा हेतू हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे, असे दिसून येत आहे. पुणे पोलीस सरकारच्या इशा-यावर चालणारे प्यादे बनले आहेत असं म्हटलं आहे .

दरम्यान,२५ सप्टेंबर २०१७ रोजी लिहिलेल्या या पत्रात ‘कॉम्रेड प्रकाश’ने विद्यार्थ्यांचा वापर करत राष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यासाठी काँग्रेस नेता त्यांची मदत करण्यास इच्छुक असल्याचे ‘कॉम्रेड सुरेंद्र’ यांना म्हटले होते. या पत्रात एक फोन क्रमांकही लिहिला आहे. हा क्रमांक काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आहे. पुणे पोलिसांच्या मते, कॉम्रेड सुरेंद्र म्हणजे सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संदर्भात आहे. जे नागपूरमध्ये वकिली करतात. त्यांना जूनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. तर कॉम्रेड प्रकाश हे सीपीआयएमच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.

शहरी माओवाद्यांना अटक; ‘त्या’ पत्रात नेमके आहे तरी काय?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक; पोलिसांच्याच अडचणीत वाढ!

कॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी