चोरीला गेलेले 45 लाख रुपयांचे दागिने नागरिकांना परत

पुणे: पुणे शहरात वेगवेगळ्या भागातून चोरी गेलेले 45, लाख 37 हजार 743 रुपये किंमतीचे दागिने  पुणे पोलिसांनी मूळ मालकाला बुधवारी परत केले. यावेळी  पोलिसांनी पुणे शहरातील 72 गुन्हे उघडकिस आणल्याची माहिती दिली आहे.

चोरीला गेलेले दागिने परत करण्याचा हा सोहळा शिवाजीनगर मुख्यालयातील परेड ग्राऊंडवर बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. चोरीला गेलेले दागिने , वस्तू परत मिळाल्यानंतर तक्रारदार नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू पोलीस आपल्या वस्तू समजून शोध घेत असतात,नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा. पोलिसांकडे माणूस म्हणून पाहण्याचं आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. यावेळी सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, अप्पर आयुक्त रवींद्र सेनगावकर, अप्पर आयुक्त शशिकांत शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले हे उपस्थित होते.