सत्ताधारी भाजपने पुणेकरांना कर्जबाजारी केले विरोधी पक्षांची टीका

पुणे – पुणे शहरातील प्रस्तावित २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटींचे कर्ज रोखे  उभारण्यात आले आहे. या कर्जरोख्याच्या पहिल्या टप्यातील 200 कोटींच्या कर्जरोख्यांची आज केंद्रीयमंत्री वैकया नायडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि कॉग्रेसच्या वतीने मंडई मधील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला.

समान पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून अर्थसाह्य घेऊन हि योजना पूर्ण करावी अशी भूमिका कॉग्रेस आणि राष्टवादी कॉग्रेची होती. मात्र सत्ताधारी पुणेकरांना कर्ज बाजरी करून  योजना राबवित असल्याच्या आरोप यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

यावेळी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे , कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे ,  माजी शहराध्यक्ष अभय छाजेड , राष्टवादीच्या महिलाशहराध्यक्ष  रुपाली चाकणकर यांच्यासह कॉग्रेस आणि राष्टवादीचे नगरसेवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.