सभागृहात नगरसेवक अवतरले थेट बोट घेऊन

पुणे – पावसाळ्याच्या मुहूर्तावर पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट होड्या घेऊन पालिका सभागृहात प्रवेश करत अभिनव आंदोलन केले. सुमार दर्जाच्या नालेसफाईमुळे पुणेकरांना आता गाड्यां सोडून होड्या  घेऊन प्रवास करण्याची वेळ आल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे.

शहरातील नाले सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचं होत. मात्र, ते न झाल्याने महापौर मुक्ता  टिळक यांनी देखील नाले सफाईच्या कामावर नाराजी दर्शविली होती. त्यानंतर आदेश देऊनही योग्य त्या प्रकारे नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्यामुळे अद्यापही नाले सफाईचा प्रश्न न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधात आक्रमक होत आज आंदोलन केल आहे.

यावेळी नगरसेवक योगेश ससाणे आणि सायली वांजळे यांनी बोटी घेऊन महापालिकेत प्रवेश केला. तसेच नाले सफाईच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.