वाहतूक नियमाबाबत पालिका करणार जनजागृती

pmc

टीम महाराष्ट्र देशा -वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत महापालिका जनजागृती करणार आहे. विशेषतः बीआरटीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमणाबाबत जनजागृती केली जाणार असून त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच वाहतूक नियोजन आणि बीआरटीएसबाबत अहमदाबादचा दौरा फलदायी ठरला असल्याच दावाही त्यांनी केला. वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. सिग्नल लागल्यावर चालकाने थांबले पाहिजे.

त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वाहतूक नियमनाबाबत पालिका जनजागृती करणार आहे. त्यासाठी लवकरच एका खासगी संस्थेची नेमणुक करण्यात येणार आहे. सिग्नलचे टाईमिंग डिझाईन करण्याचे काम सुरु आहे. सिग्नच्या बदलाचे मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. स्पीड ब्रेकर लावण्यात येणार आहेत. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील एन्ट्री आणि एक्झिट वारंवार न बदलण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक नियोजन आणि बीआरटीएसबाबत अहमदाबादचा दौरा फलदायी ठरल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, या दौ-यात नियोजन विकासाची माहिती देण्यात आली. पालिकेने नवीन विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखाड्यामध्ये नगरसेवक, नागरिकांचा ‘रोल’ काय असणार आहे. वाहतूक नियोजनाची माहिती घेण्यात आली. बीआरटी, मेट्रो, पार्किंग, बस यावर चर्चा करण्यात आली. कशाला, कोणत्या कामाला जास्त महत्व दिले गेले पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. तसेच बीआरटी, ऐतिहासिक स्थळांची माहिती, रिंगगरोडच्या प्रकल्पाची पाहणी केल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.