सेक्सक्वीन कल्याणी देशपांडेचे जाळे अजूनही शहरात ‘अॅक्टीव्ह’ ?

pune-plice-arrested-klyani-deshpande-relative-in-sex-racket-case

पुणे: आयटी आणि शैक्षणिक हब असणाऱ्या पुणे शहरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालांचे सध्या चांगलेच पेव फुटल्याच दिसत आहे. पोलिसांकडून अशा लोकांवर कारवाई देखील केली जाते. मात्र पुढे जामिनावर सुटल्यावर हे दलाल नवीन जोमाने कामाला लागत असल्याच नजीकच्या काळात उघड झाल आहे.

शहरातील सेक्सक्वीन म्हणून ओळखली जाणारी जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे हि सध्या जेलमध्ये आहे. मात्र, जेलमध्ये असताना देखील तिचे अवैद्य नेटवर्क अजूनही शहरात ‘अॅक्टीव्ह’ असल्याच दिसत आहे. याला कारण आहे ते कल्याणी देशपांडेचा दिर असणाऱ्या निलेश देशपांडे याच्या अटकेचे.

कल्याणी देशपांडेचा दिर निलेश देशपांडे हा त्याचा दुसरा साथीदार जश्मीन एजंटच्या मदतीने हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यावेळी पोलिसांनी एका परदेशी महिलेची वैश्याव्यवसायातून सुटका केली.

दरम्यान निलेश देशपांडे हा एजंटकरवी परदेशी तरुणींना बोलावून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे. यावेळी निलेश देशपांडेकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल २०१६ पासून जेलमध्ये असणाऱ्या कल्याणी देशपांडेच्या नावावर आहे.

पुण्यामध्ये अवैद्य व्यवसायाची क्वीन म्हणून कल्याणी देशपांडेला ओळखल जात. तिच्या रॅकेटचे नेटवर्क संपूर्ण शहरभर पसरले होते. याच प्रकरणी २००० मध्ये पहिल्यांदा कल्याणी देशपांडेला अटक करण्यात आली. तेव्हापासून ते आजवर खुनाच्या दोन गुन्ह्यांसह तब्बल २० च्यावर गंभीर गुन्हे देशपांडेवर दाखल आहेत.

2008 मध्ये कल्‍याणीला तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी असणाऱ्या लागेबांध्यामुळे देशपांडे शहरातच ठाण मांडून राहत असल्याच बोललं जात. अखेर २०१६ मध्ये कोथरुड पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली. दरम्यान निलेश देशपांडेला करण्यात आलेल्या अटकेने अद्यापही कल्याणी देशपांडेचे नेटवर्क शहरात अॅक्टीव्ह असल्याच दिसत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यात पोलिसांना यश येणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे.Loading…
Loading...