डल्लामार पार्किंग धोरणाला पुणेकरांचा वाढता विरोध; पार्किंग माफिया तयार होण्याची भीती

pune corporation new parking policy

पुणे महापालिका स्थायी समितीने मंगळवारी पार्किंग धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे शहरात पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने शिस्त लावण्यासाठी पार्किंग धोरण गरजेचं असल्याचं सत्ताधारी भाजपकडून सांगितलं जातं आहे, मात्र अशा प्रकारे पार्किंग शुल्क आकारून पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारण्याच काम सत्ताधाऱ्यांकडून केलं जात असल्याची टीका विरोधक तसेच सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

प्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या दरांमध्ये ८० टक्क्यांनी कपात करत बहुमताच्या जोरावर या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणेकरांवर नव्याने कोणतेही कर लादले जाणार नसल्याच खुद्द भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले होते. मात्र आज मंजूर करण्यात आलेल्या पार्किंग धोरणामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे दर वेगळे असणार आहेत .

पार्किंग धोरणावर बोलताना सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले कि, कोणताही अभ्यास न करता पार्किंग धोरण तयार करण्यात आल आहे. त्यामुळे येत्या काळात गोंधळ निर्माण होवू शकतो. शहरातील सार्वजनिक वाहूतक व्यवस्था दुबळी आणि बेभरवशाची असल्यानेच नागरिकांनी वाहने घेतली आहेत. मात्र आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार असल्याने नागरिकांची लुट होणार आहे. यामध्ये केवळ ठेकेदराचं भल होणार आहे

तर मनसेकडून देखील याला विरोध केला जात आहे, भाजप हा व्यापारी पक्ष आहे त्यामुळे ते केवळ व्यापाऱ्यांचाच विचार करतात. आज पुणे शहरामध्ये किती ठिकाणी गाड्या उभ्या राहतात याची आकडेवारी महापालिकेकडे नाही. पार्किंग धोरणामुळे माफिया तयार होतील कारण केवळ तेच असे पैसे वसूल करू शकता. मनसेच्या वतीने याला नक्कीच विरोध केला जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करणार असल्याच माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी सांगितले आहे.

असे असणार पार्किंगचे दर
वाहन                  झोन अ         झोन ब       झोन क
दुचाकी वाहन             २                3               4
रिक्षा                        6                9              12
चार चाकी               10              15              20
माल वाहतूक             6                9              12
मिनी बस                15              23              30
अवजड माल वाहतूक 20              30              40
खासगी प्रवाशी बस    30             45               60
( आकडे रुपयांमध्ये )