fbpx

पुणे : ‘फ्रीडम फॅमिली रन’ मॅराथॉनचे आयोजन

पुणे – फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उंड्री येथे मॅराथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. निरोगी, सुदृढ आणि स्वास्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उंड्रीतील कंट्री क्लबपासून या मॅराथॉनला सुरवात झाली. धावे साठी १० , ५ आणि ३ किमीचा मार्ग आखून देण्यात आला होता.

क्लब चे अध्यक्ष वाय राजीव रेड्डी, व्यवस्थापक रामदास प्रभु, फ्री रनर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कमांडर जितेन्द्रन नायर आणि त्यांचे सहकारी, दोराबजी मॉंल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन मलिक, पुण्याचे धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, मिसेस इंडिया इंटरनॅशनल मंजुशा मुळीक आणि मिसेस पुणे 2018 कांचन मोटवानी या वेळी उपस्थित होते. ‘फ्रीडम फॅमिली रन’ धावेच्या उद्घाटन प्रसंगी नायर म्हणाले, “मॅराथॉन आयोजित करताना ही स्पर्धा न ठेवता उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे हीच इच्छा होती. रेड्डी म्हणाले,” समाजात स्वास्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी जनजागृतीची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आम्ही गेली चार वर्षे पुणे व्यतिरिक्त मुंबई बेंगलोर आणि हैदराबाद याठिकाणी सहकुटुंब सहपरिवार मॅरेथॉन ही संकल्पना राबवत आहोत”. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक झुंबा या व्यायाम प्रकाराने करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या