तुकाराम मुंढे बाबत पुणे! नवी मुंबई होणार का ?

पुण्यात तुकाराम मुंढेना सामाजिक संघटनांचा वाढता पाठींबा

संदीप कापडे. पुणे : कोणत्याही घटनेवर पुणेरी ‘स्टाईलने’ फलक लावत व्यक्त होण्याची पुणेकरांची सवय आहे . याचच दर्शन सध्या पुणे शहरात होताना दिसत आहे . शालेय विद्यार्थी बस दर वाढीवरून  नियमावर बोट ठेवून काम करणारे  पीएमपीएलचे संचालकीय व्यवस्थापक तुकाराम मुंढे यांना मध्यंतरी राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोर जाव लागल होत.  तसेच खुद्द महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून मुंढेच्या बदलीचे वक्तव्य करण्यात आल होत. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी  मुंढेनां चांगलंच धारेवर धरल्याच पहायला मिळाल.

आता तुकाराम मुंढे हे चांगल काम करत असून ते पुणेकरांना हवे असल्याचे फलक सामाजिक संघटनाकडून शहरात लावण्यात आल्याच दिसत आहे.

“पीएमपीएल सक्षम करणारे मुंढे साहेब तुम्हाला आमचा पाठींबा “असे फलक शहरात झलकु लागले आहेत. विशेष म्हणजे पीएमटी बस स्टॉप वरच हे फलक लावण्यात आले आहेत. मुंढेच्या  बदली वरून पुणेहि नवी मुंबई होणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

You might also like
Comments
Loading...