चेंबरमध्ये पाय अडकलेल्या मुलीची सुटका

पुणे – बाणेर रोडवरील हॉटेल महाबळेश्वरजवळ एका बारा वर्षीय मुलीचा चेंबरमधे अडकलेला पाय अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप काढला. सुगला पवार असे लोखंडी जाळीच्या चेंबरमध्ये पाय अडकलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुगला पवार ही हॉटेल महाबळेश्वरजवळील रस्त्यावरून जात असताना तिचा डावा पाय अचानक गटाराच्या चेंबरमध्ये अडकून पडला.

यावेळी चेंबरमध्ये अडकल्याने ती जोरजोरात रडू लागली.त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा होऊन त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले. काही वेळातच पाषाण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले आणि त्यांनी कटर मशीन आणून लोखंडी चेंबरची पट्टी कापून अडकलेल्या सुगलाची 15 मिनीटात सुटका केली.

You might also like
Comments
Loading...