केरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना !

टीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. पुरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु असताना आज पुण्याहून एनडीआरएफच्या आणखी चार तुकड्या साहित्यासह सर्व तुकड्या आज सकाळीच विमानाने केरळाकडे रवाना झाल्या.

पुरामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून राज्याचे ८ हजार कोटीचे नुकसान झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुसळधार पावसात राज्यातील विविध भागात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याने सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे याच्या लक्ष ठेवण्यात आले आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंंदर्शन