भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; अजित पवारांच्या नेतृत्वात पुण्यात काढणार मोर्चा

अजित पवार

पुणे: नोटबंदी, शेतकरी कर्जमाफी, महागाई अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले असून याचा जाब विचारण्यासाठी ८ नोव्हेंबरला पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफीची योजना सरकारने काढली. मात्र ही योजना फसवी असून सरकारने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सगळीकडे खड्यांच साम्राज्य निर्माण झाल असल्यान नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीका कामठे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाच नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे करणार असून. खासदार सुप्रिया सुळे तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मंडई परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवडमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही जालिंदर कामठे यांनी केलं आहे.

1 Comment

Click here to post a comment