हि तर भाजपच्या भ्रष्ट्राचाराची पॉलिसी; राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्किंग धोरणा विरोधात आंदोलन

पुणे शहरामध्ये पार्किंग शुल्क आकारून येत्या काळात सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारला जाणार आहे. एका बाजूला भाजप शहराध्यक्ष हे धोरण मंजूर करण्यास विरोध करतात तर दुसरीकडे मुंबईमधून फोन येतो आणि विषयाला मंजुरी दिली जाते. म्हणजेच कुठेतरी आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हि पार्किंग नाही तर भाजपच्या भ्रष्ट्राचाराची पॉलिसी असल्याची टिका पुणे महापालिका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी केली आहे. स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या पार्किंग पॉलिसी विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आल यावेळी ते बोलत होते.

आजवर पुणे शहरामध्ये रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते, मात्र आता कोठेही गाडी पार्क करायची झाल्यास शुल्क द्यावे लागणार आहे. मंगळवारी (दि २०) स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपकडून बहुमताच्या जोरावर पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, आता सामान्य पुणेकर नागरिक आणि विरोधी पक्षांकडून याला विरोध केला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलनावेळी पार्किंग पॉलिसी विरोधात सह्यांची मोहीम देखील घेण्यात आली. यावेळी विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, विशाल तांबे, योगेश ससाणे, नगरसेविकाहेमलता मगर, दिपाली धुमाळ , राकेश कामठे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते