fbpx

पुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकाही आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. तसेच सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. याचदरम्यान, पुणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी १० लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्च्याकडे देण्यात आला आहे.